• Call Us
    +91 9422818721

  • Email Us
    shrigrahitcr@rediffmail.com

  • Address
    प्लाॅट नं. 23 बी, शिवनगर नंदनवन रोड, नागपूर

संस्थेविषयी माहीती

”मनोगत“

             माता पित्याचे छत्र हरवलेल्या पक्षास उंच भरारी घेण्यासाठी स्वबळावर प्रयत्न करावे लागते. अशातलीच माझी अवस्था होती. आपल्याला सुध्दा अथांग प्रयत्न करून उंच भरारी घ्यायची आहे ही अपेक्षा मनात बाळगुन मी निरंतर प्रयन्त करीत होतो माझा स्वप्नरूपी पंखांना बळ देण्याचे काम एका थोर महानूभाने केल्यामुळेच मी प्रयत्न करीत यशाच्या शिखरावर पोहचू शकलो.

              या थोर महानूभवाने मार्ग रूपे दाखवितांना मला सांगितले की, तू रोजगारासाठी फिरत न राहता रोजगाार देणारा हो. व यातून माझा मनात संस्था स्थापन करून गरजू लोकांपर्यत योग्य ती मदत करण्याचे सामथ्र्य निर्माण करण्यास बळ मिळाले व माझ्या म्हणजे श्री ग्राहीत नागरी पत सहकारी संस्थेचा दि. 07/05/2003 रोजी उगम झाला.

              अवघे 2 टेबल व 1 कर्मचारी सोबत घेवून अवघ्या 36500/-रू. स्वभागभांडवलावर मी संस्था उभी केली. त्याचे आज वटवृक्षात रूपंातर झाालेले आहे. आज संस्थेच्या 3 शाखा प्रशस्त अशा स्वमालकीच्या जागेवर स्वबळावर उभ्या असून यात 18 कर्मचारी व 52 एंजट निरंतर प्रामाणिकपणे कार्य करीत आहे. संस्थेस आजवर ”अ“ वर्ग दर्जा प्राप्त असून जिल्हास्तरीय, विदर्भ स्तरीय व अंतराज्यस्तरीय (बँको) पुरस्कार प्राप्त झाालेले आहे. संस्थेजवळ 2414.64/- लक्ष रू. च्या ठेवी असुन 1590.34/- लक्ष रू. कर्ज वाटप केलेले आहे.

            सामाजिक उपक्रमाचे गंार्भिय लक्षात घेता संस्थेतर्फे दरवर्षी निराधार व्यक्तीना आमसंभेत शिलाई मशीन वाटप करण्यात येेते. तसेच वृध्दाश्रम व अनाथ आश्रमास सुध्दा वाॅटर कुलर भेट स्वरूपात दिलेले आहे. यापेक्षाही जास्त सामाजिक उपक्रम राबवण्याचा माझा मानस आहे.

           मी जोपासलेल्या स्वप्ना नुसार संस्थेच्या भविष्यात दहा शाखा करण्याचा मानस समोर ठेवून व सभासदांच्या विश्वासास निरंतर खरे उतरून योग्य गरजूंना कर्ज स्वरूपात मदत करून त्यांना आर्थिक सहकार्य करण्याचे उद्देश समोर ठेवून निरंतर कार्य करण्याचे ठरविले आहे. तसेच मी संस्था स्थापन करण्या मागचा उददेश समोर ठेवून प्रामाणिकपणे कार्य करण्याची प्रेरणा मला प्राप्त होईल तसेच माझा श्वासाच्या शेवटपर्यत कार्य करण्याचे बळ मला प्राप्त होवो हिच ईश्वर चरणी अपेक्षा ठेवतो.

"जय हिंद जय सहकार"